सुधागडात भात खरेदी केंद्र सुरू करा

मनसेची मागणी; पाली तहसीलदारांना दिले निवेदन
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील भात खरेदी केंद्र ताबडतोब सुरू करावेत अशी मागणी सुधागड मनसेने केली आहे. या मागणीचे निवेदन पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार यांना देण्यात आले.
साधारण दसर्‍यापर्यंत येथील भात तयार होतो. मात्र भात खरेदी केंद्र दिवाळी नंतर सुरू होतात. दिवाळी सणाला शेतकर्‍यांच्या हाती पैसे नसतात. परिणामी नाईलाजाने शेतकर्‍यांना आपला भात खाजगी व्यापार्‍यांना कमी किंमतीत विकावा लागतो. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होते. म्हणून लवकर भात खरेदी केंद्र सुरू करण्यात यावेत अशी मागणी मनसेने केली आहे. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष सुनिल साठे, विभाग अध्यक्ष केवल चव्हाण, महेश पोंगडे महाराज, शेखर चव्हाण, परेश वनगले व समीर लोंढे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version