कोलाड-रोहा बस सुरु करा; प्रवाश्याची मागणी

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा-कोलाड मिनिबससेवा ही अनेक महिन्यांपासून बंद करण्यात आली होती. परंतु ती मिनिबससेवा अद्याप सुरु करण्यात आली नाही, यामुळे विद्यार्थी, पालकवर्ग व प्रवाशी वर्गातून रोहा-कोलाड मिनीबससेवा सुरु करण्यात अशी मागणी केली जात आहे. 13 जून पासून शाळा कॉलेज नियमितपणे सुरु झाले असून कोलाड रोहा मार्गावर कै द.ग तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ग्रीग्रोरियन स्कूल, एम. बी. मोरे, राठी स्कूल, डॉ सी.डी.देशमुख कॉलेज तसेच इतर कॉलेज असल्यामुळे या मार्गावरून कोलाडकडून रोहाकडे व रोहाकडून कोलाडकडे शाळा कॉलेजला जाणारे येणारे हजारो विद्यार्थी येजा करीत असतात.

कोरोनामुळे शाळा कॉलेज बंद करण्यात आले होते तसेच एस टी संप यामुळे कोलाड रोहा मिनिबससेवा बंद करण्यात आली होती. परंतु सर्व परिस्थिती पूर्व पदावर आली आहे. तसेच याशिवाय या मार्गावर औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे असंख्य कामगार वर्ग, ज्येेष्ठ नागरिक, याच मार्गावरून येजा करीत असतात. त्यामुळेया मार्गांवर मिनीबससेवा सुरु करावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.

या मार्गांवर कोलाड जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचे सभागृह असल्यामुळे या मंडळात 500 वर सभासद असून या मंडळाच्या वेळोवेळी सभा घेतल्या जातात तसेच जेष्ठ नागरिक यांना शासनाकडून आर्धा तिकीटची सुविधा केली आहे परंतु या मार्गांवर मिनिबस सेवा सुरु नसल्याने याचा फटका जेष्ठ नागरिकांना बसत आहे.

– दगडू बामुगडे, जेष्ठ नागरिक
Exit mobile version