पेण- पनवेल लोकल सुरू करा: सामाजिक कार्यकर्ते जीवन पाटील

| खरोशी | प्रतिनिधी |

पेण पनवेल लोकल सेवा सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने करत असल्याने आजही सोशल मीडियावर अनेक नागरिक यासाठी आवाज उठवत आहेत, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. तरी लवकरात लवकर पेण पनवेल लोकल सेवा सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व व निवृत्त अभियंता जीवन पाटील यांनी केली आहे. पेण पनवेल लोकल रेल्वे सेवा सुरू करावी यासाठी 03 सप्टेंबर 2025 रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सविस्तर पत्र पाठवून ही मागणी अधिकृतरीत्या केली असल्याचे सांगितले. या लोकल रेल्वे पेण, रसायनी, नागोठणे व रायगड परिसरातील नागरिकांना होणाऱ्या अडचणी, प्रवासातील गैरसोय, वेळ व खर्च यांचा सविस्तर उल्लेेख करून पनवेल-पेण लोकल सेवा तातडीने सुरू करण्याची विनंती करण्यात आली होती. दुर्दैवाने, आजतागायत या पत्राला कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही. आज पुन्हा एकदा आपण सर्वांनी एकत्र येऊन ही मागणी अधिक तीव्रतेने पुढे नेण्याची गरज आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि एकजुटीने नक्कीच हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्तकेला आहे.

Exit mobile version