पिल्लई एचओसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केली एटीव्ही बाईक

| आपटा | वार्ताहर |
रसायनी येथील पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी स्टारकर मोटारबाईकची निर्मिती केली आहे. पंचवीस विद्यार्थ्यांनी यामाहा एफझेड 25 या बाईकचेे इंजिन वापरून ही बाईक तयार केली आहे.

ही बाइक कोणत्याही परिस्थितीत रोडवर धावू शकते याचे प्रात्यक्षिक महाविद्यालयात मैदानावर करून दाखवल.ही बाईक काँडटाँक बाईक स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाणार आहे.
या बाईक तयार करण्यासाठी पिल्लईचे अध्यक्ष डॉ. के.एम.वासुदेवन,सचिव डॉ. डँफनी पिल्लई यांनी मोठे योगदान दिले आहे.यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. निवेदिता श्रेयांश, डेप्युटी सीईओ डॉ. लता मेनन उपस्थित होत. ही बाइक बनविण्यासाठी प्राचार्य डॉ जगदीश बाकल,मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ.जी.व्ही. पाटील, के. एस.अनिष,आदित्य शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. यापूर्वीही गो कार्ट कार स्पर्धेत भारतात प्रथम क्रमांक पटकावला होता. मागील वर्षी आय आय टी बाँम्बे यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत इलेक्ट्रीक बाइक बनवून प्रथम क्रमांक पटकावला होता. आता ही केलेली बाइक मदुराई येथील स्पर्धेत उतरणार आहे. ही बाइक तयार करण्यात सर्व सामान्य घरातील मुले आहेत. यासाठी चार लाख खर्च केला असून, ही बाईक पेट्रोलवर चालत आहे.

Exit mobile version