खारपाले येथे लसीकरणास प्रारंभ

। पेण । वार्ताहर ।
कोरोनाचा प्रादुर्भाव म्हणावा तेवढा कमी झालेला नाही. पेण तालूक्यात 4 प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय पेण शहर यांनी कंबर कसली आहे. खारपाले येथे 60 जणांना कोविशिल्ड लस देण्यात आली आहे.

यासाठी प्रांत अधिकारी व तहसीलदार डॉ. अरुणा जाधव व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील हे संस्था संघटनांशी सातत्यपूर्वक समन्वय साधून कार्यरत आहेत. खारपाले येथे साकव संस्था व खारपाले ग्रामपंचायतीच्या संयुक्तिक विद्यमाने गडब प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने खारपाले, मौजेपाले, म्हैसबाड या गावातील 45 ते 60 वयोगटातील एकूण 60 महिला व पुरुषांना कोविशिल्ड लस देण्यात आली आहे. अजूनही ग्रामपंचायत क्षेत्रात 125 ते 150 जनाचे लसीकरण बाकी असून शासनाने लसीची उपलब्धता करुन द्यावी अशी ग्रामपंचायतीने मागणी केली आहे.

गडब प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने डॉ. विशाखा पाटील, आरोग्य सेविका एच. पी. पाटील, भाग्यश्री गुरंबे, टी. जी. मोकल, सी. आर. शिर्के, एस. पी. घरत व अशा वर्कर निलम राणे यांनी भाग घेतला होता.

Exit mobile version