ठरला विठाबाई गोविंद पथक खारपाले
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये प्रथमच मोठया रक्कमेच्या दहीहंडीचे आयोजन वैकुंठ पाटील मित्रमंडळाने हमरापूर विभागातील जोहे येथे केले होते. या दहीहंडी स्पर्धेसाठी स्थानिक पंधरा तर बाहेरील चार गोविंदा पथकाने आपली हजेरी लावली होती. श्रध्दा पोतदार हिने हजेरी लावली. या स्पर्धेमध्ये विठाबाई महिला गोविंद पथक खारपाले यांनी सलामी दिली. या स्पर्धेत बालमित्रमंडळ गोविंदा पथक गडब, विठाबाई गोविंदा पथक खारपाले, द्रोणोगिरी साई गोविंदा पथक करंजा आणि व्याघ्रेश्वर गोविंदा पथक पिरकोन या व्यावसायिक गोविंदा पथकांनी सहभाग घेउन स्पर्धेत चुरस निर्माण केली. मात्र विठाबाई खारपाले यांनी अंतिम सात थर लावून वैकुंठ पाटील मित्रमंडळाच्या दहीहंडीवर आपले नाव कोरले. या स्पर्धे ठिकाणी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपली हजेरी लावली होती.