रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू

शेकापच्या पाठपुराव्याला यश

| पनवेल | वार्ताहर |

साईनगर येथून कळंबोलीला कर्नाळा स्पोर्ट्स मार्गे जाण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत कच्चा रस्ता आहे. पावसाळ्यामध्ये सदर रस्त्याचे दुरुस्तीचे काम विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेविका सारिका भगत यांनी रहिवाशीयांना करून दिले होते. त्यानंतर सदर रस्ता हा डांबरीकरण करावा या रहिवाशांनी केलेल्या मागणीला त्वरित प्रतिसाद देत प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी संबंधित विभाग अधिकार्‍यांकडून सदर रस्त्याची पाहणी करून नागरिकांना होणारी गैरसोय लवकरात लवकर दूर करावी, अशी सूचना केली होती. सारिका भगत यांनी पाठपुरावा केला. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून सदर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

त्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची स्वतः जातीने उपस्थित राहून श्री. प्रितमदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेविका सारिका भगत, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर आणि शेकाप पदाधिकार्‍यांनी पाहणी केली. रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू केले त्यामुळे तेथील रहिवासी यांनी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचे आभार मानले.

Exit mobile version