रायगड जिल्ह्याचा पुरुष संघ जाहीर
। गडब । वार्ताहर ।
15 ते 17 जुलै दरम्यान पुणे बालेवाडी येथे होणार्या 71 व्या महाराष्ट्र् राज्य अंजिक्यपद, निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने पुरूष गटाचा कबड्डी संघ जाहीर केला असून या संघाचा सराव शिबीर पांडवादेवी येथील जय मंगळ सभागुहात घेण्यात आले. या सराव शिबिराचे सांगता समारंभ प्रसंगी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह जे.जे. पाटील, हिराचंद पाटील प्रथमेश पाटील, जनार्दन पाटील, फिटनेस ट्रेनर संतोष शिर्के, राष्ट्रीय खेळाडू ऋणाली मोकल, अशिष पाटील, सुधिर पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा असोसिएशनने उत्तम प्रकारे सराव शिबीर आयोजित केले होते. रायगड जिल्ह्याच्या पुरुष गटाच्या कबड्डी संघाने राज्य अंजिक्यपद कबड्डी स्पर्धेत चांगली कामगिरी करावी, असे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह जे. जे. पाटील यांनी या वेळी खेळाडुना मार्गदर्शन करताना सांगितले.
खेळांडुनी सराव शिबिरात कसून सराव केला असून रायगडचा संघ राज्य अजिक्यपद कबड्डी स्पर्धेत चमकदार कामगिरी करेल असे संघाचे प्रशिक्षक प्रथमेश पाटील, व्यवस्थापक हिराचंद पाटील यांनी सांगितले. राज्य अंजिक्यपद स्पर्धेत सांघिक खेळ करुन या स्पर्धेत विजय संपादन करु असे खेळाडूंना सांगितले. रायगड जिल्हयाच्या कबड्डी संघात निवड झालेल्या खेळाडूंचे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पदाधिका-यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
रायगड जिल्हा पुरुष कबड्डी संघ
ऋत्विक पाटील (कर्णधार), प्रशांत जाधव (उपकर्णधार), मयूर कदम, निलेश थळे, दिपक कासारे, प्रतिक बैलमारे, अनुराग सिंग, राकेश गायकवाड, सुमित पाटील, प्रणव ईदूलकर, वैभव मोरे, निखिल शिर्के, संघ व्यवस्थापक हिराचंद पाटील, संघ प्रशिक्षक प्रथमेश पाटील.