| रायगड | खास प्रतिनिधी |
उद्योजकांनी महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखविला असून, आज सुमारे चार हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे 5 हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतील, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
पुणे-वाकड येथील हॉटेल टिपटॉप येथे आयोजित महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच, देशातील 24 तज्ज्ञ संस्थांसोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करारप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील मे. नाईक ओशियनिक एक्सपोर्टस् प्रा.लि., एम, 5, एमआयडीसी, तळोजा, मे. एच के एस एमपेक्स, प्लॉट नं 3, पनवेल इंडस्ट्रीयल को-ऑप इस्टेट लि., नवी मुंबई फायनरी, मे. गंधार ऑईल फायनरी (इंडिया), टी-10, एम.आय.डी.सी. तळोजा, ता. पनवेल, मे. कपुर ग्लास इंडिया प्रा. लि.,200/201/212, जवाहर को-ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट, कामोठे, पनवेल या घटकांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्य निर्यात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योगविकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, अपर उद्योग आयुक्त प्रकाश वायचळ, अपर उद्योग संचालक संजय कोरबु, उद्योग सहसंचालक शैलेश रजपूत आदी उपस्थित होते.