स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांची ग्राहकांशी अरेरावी

| कर्जत | प्रतिनिधी |

स्टेट बँक ऑफ इंडिया कर्जत शाखेतील कर्मचारी नेहमीच उद्धटपणे वागतात, असा आरोप ग्राहकांनी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या एकूणच वर्तणुकीबाबत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, बँकेचे शाखाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, मी कर्मचाऱ्यांना समज देतो असे सांगून त्यांनी वेळ निभावून नेली.

बँकेचे काही नियम ठरले असतील तर त्यांनी ते बँकेच्या कार्यालयामध्ये प्रसिद्ध करावेत, मात्र बँकेतील कर्मचारी ठरवतील ती नियमावली बँकेत राबविली जाते, बँकेच्या प्रत्येक खिडकीत त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची नियमावली असते, विशेष म्हणजे काही गोष्टी ते नम्रपणे न सांगता ग्राहकाला अपमानित करुन आणि ग्राहकांशी उद्धटपणे बोलून सांगतात, असा आरोप ग्राहकांनी केला आहे. खरे तर, ग्राहकांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. मात्र त्या ठिकाणीं पगारी कर्मचारी असलेले बँक कर्मचारी मात्र ग्राहकांवर अरेरावी करतात, असा आरोपही त्यांनी केला आहे.

तुम्ही स्लीप भरली आहे ती फाडून द्या, एटीएम कार्डमधून व्यवहार करा, ऑनलाईन व्यवहार करा, पासबुक बाहेरच्या मशीनमधून भरा, सर्वच गोष्टी ग्राहकांनी करायचे, तर बँकेतील कर्मचाऱ्यांनी काय करायचे, असा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Exit mobile version