राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

सोलापूर, रत्नागिरीची विजयी सलामी

। धाराशिव । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा 30 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. रविवारी (दि.27) सुरू झालेल्या या स्पर्धेत सलामीच्या दिवशी सर्व सामने एकतर्फी झाले. या खो-खो स्पर्धेत सोलापूर, रत्नागिरी व नाशिक या संघाच्या मुलं व मुलींच्या संघाने सुवर्ण महोत्सवी कुमार व कुमारी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.
सोलापूरच्या मुलांनी जालन्यावर 21-8 तर मुलींनी बीडवर 17-5 असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळविला आहे. रत्नागिरीच्या मुलांनी लातूरचा 17-7 व मुलींनी नांदेडचा 19-6 असा एक डावाने धुव्वा उडवला. तर, नाशिकच्या मुलांनी हिंगोलीला 26-4 तर मुलींनी नंदुरबारला 20-4 असे एका डावाने नमवले आहे. मुलींच्या गटात धाराशिव, जालना व मुलांच्या गटात सांगली, बीड यांनीही प्रतिस्पर्धी संघावर शानदार विजय मिळविले आहेत.

चमकलेले खेळाडू
कुमार गट :
मच्छिंद्र वाघमारे (अहिल्यानगर, 3.10 मिनिटे संरक्षण व 6 गुण), आशिष बालाडे (रत्नागिरी, 6 व 3 मिनिटे नाबाद), अभिषेक हिवाळे (बीड, 3.50 मिनिटे व 2 गुण), प्रेम दळवी (सांगली, 1 मिनिटे नाबाद व 8 गुण), सोलापूर (कृष्णा बनसोडे 2.35 मिनिटे व 3 गुण), शुभम चव्हाण, 3 मिनिटे नाबाद व 2 गुण).
कुमारी गट : समृद्धी सुरवसे (सोलापूर, 4.20 मिनिटे), अनुष्का पवार (5 गुण), मृण्मयी नागवेकर (रत्नागिरी, 4.20 मिनिटे), युवा पालवे (5 गुण), तेजल सहारे (नाशिक, 5.10 मिनिटे व 5 गुण), अश्‍विनी शिंदे (धाराशिव, 3 मिनिटे व 4 गुण), प्रणाली काळे (1.30 नाबाद, 3.30 मिनिटे व 2 गुण).
अन्य निकाल :
कुमार गट :
अहिल्यानगर विरुद्ध नांदेड 22-8 ,
बीड विरुद्ध परभणी 12-11,
सांगली विरुद्ध जळगाव 22-8.
कुमारी गट : जालना विरुद्ध हिंगोली 12-2,
धाराशिव विरुद्ध परभणी 12-6,
पालघर विरुद्ध जळगाव 12-5.
Exit mobile version