राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा


| पुणे(फुलगाव) | प्रतिनिधी |

नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या प्रांगणात स्व. खा. गिरीश बापट यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएसनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने 34 किशोर किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे अजिंक्य पद किशोर गटात पिंपरी चिंचवड संघाने स्वर्गीय नारायण नागु पाटील, रायगड फिरता चषक पटकाविला व किशोरी गटात जालना संघाने स्वर्गीय सौ.राजश्री चंदन पांडे परभणी यांचे स्मरणार्थ फिरता चषक पटकावत अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. किशोर गटातील पिंपरी चिंचवड संघाने नंदुरबार संघावर 53-29 असा सहज विजय मिळविला. नंदुरबारच्या सुशांत शिंदे यांने काही चांगल्या पकडी घेतल्या. नंदुरबारच्या खेळाडूंनी 11 बोनस गुण मिळविले.



किशोरी गटात जालना संघाने नासिक शहर संघावर 37-35 असा निसटता विजय मिळविला. जालन्या संघाने नासिक शहरावर पहिल्या डावात एक व दुसऱ्या डावात एक लोन लावत 4 गुण मिळविले. तर 5 बोनस गुण मिळविले. नासिक शहरच्या बिदिशा सोनार व अस्मिता चव्हाण यांनी जोरदार प्रतिकार करीत सामना जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केल्या. कामिनी जाधव हिने सुरेख पकडी घेतल्या. नासिक शहरच्या खेळाडूंनी दुसऱ्या डावात एक लोन लावत 2 गुण मिळविले व बिदिशा सोनारने 10 बोनस गुण मिळवून सामन्यात चांगलीच रंगत आणली होती. मात्र त्यांना यश मिळाले नसल्याने विजेते पदाने त्यांना हुलकावणी दिली.

Exit mobile version