राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खो-खो स्पर्धा

पुरुषाचे मुंबई उपनगरला तर महिलांचे पुण्याला अजिंक्यपद

| मुंबई । प्रतिनिधी ।

58 वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवडचाचणी खो-खो स्पर्धेत गतविजेत्या पुण्याला पराभवाची धूळ चारत मुंबई उपनगरने अतिशय चुरशीच्या सामन्यात पुरूषांचे अजिंक्यपद मिळवले. महिलांचा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला. महिलांमध्ये गतविजेत्या पुण्याने पुन्हा एकदा ठाण्याचा शेवटच्या क्षणाला पराभव केला व गतवर्षीची विजयी परंपरा कायम राखली. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने हिंगोली जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली तालुका खो-खो असोसिएशन आयोजित राज्यअजिंक्यपद स्पर्धा रामलिला मैदानात पार पडली. शेवटच्या दिवसाच्या सत्रातील अंतिम सामने रंगतदार झाले. महिलांच्या अंतिम सामन्यात पुण्याने ठाण्यावर 12-11 असा 1 गुणाने मात केली.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने गतविजेत्या पुण्याला पराभवाची धूळ चारत गेल्या वर्षाच्या पराभवाचा बदला घेतला. पुरुषांचा अंतिम सामना सुध्दा चुरशीचा झाला.

पारितोषिक वितरण जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झाला. यावेळी यावेळी भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अरुण देशमुख, आदी उपस्थित होते.

सर्वोत्कष्ट खेळाडू
पुरुष : अष्टपैलू आणि राजे संभाजी पुरस्कार: सुयश गरगटे (पुणे) संरक्षक: निहार दुबळे (मुंबई उपनगर), आक्रमक: अनिकेत पोटे (मुंबई उपनगर).
महिला: अष्टपैलू आणि राणी अहिल्या पुरस्कार : रेश्मा राठोड (ठाणे), संरक्षक: काजल भोर (पुणे), आक्रमक : प्रियंका इंगळे (ठाणे)

Exit mobile version