। परभणी । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशन मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या सहकार्याने दि. 3 ते 6 डिसेंबर या कालावधीत 49 व्या कुमार/कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. माणिकराव गुट्टे क्रीडानगरी, जायकवाडी वसाहती समोर, कोद्री रोड, गंगाखेड, परभणी येथे मातीच्या 6 क्रीडांगणावर ही स्पर्धा खेळविण्यात येईल.
यंदा प्रथमच कुमारी गटात सर्व संलग्न जिल्ह्या संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला आहे. सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनचे सचिव आस्वाद पाटील यांनी ही गटवारी गुरुवारी एका परिपत्रकाद्वारे प्रसार माध्यमाकरिता जाहीर केली.
कुमार गट :- अ गट :- 1)कोल्हापूर, 2)बीड, 3)मुंबई शहर, 4)उस्मानाबाद. ब गट :- 1)मुंबई उपनगर, 2)नंदुरबार, 3)नाशिक, 4)धुळे. क गट :- 1)पालघर, 2)सातारा, 3)ठाणे, 4)सिंधुदुर्ग. ड गट :- 1)परभणी, 2)पुणे, 3)जळगाव, 4)जालना. इ गट :- 1)अहमदनगर, 2)रायगड, 3)औरंगाबाद, 4)सोलापूर. फ गट :- 1)सांगली, 2)रत्नागिरी, 3)लातूर, 4)नांदेड, 5)हिंगोली.
कुमारी गट:- अ गट :- 1)पालघर, 2)नाशिक, 3)सोलापूर, 4)जालना. ब गट :- 1)पुणे, 2)नांदेड, 3)कोल्हापूर, 4)उस्मानाबाद. क गट :- 1)सांगली, 2)रत्नागिरी, 3)बीड, 4)जळगाव. ड गट :- 1)मुंबई शहर, 2)अहमदनगर, 3)सिंधुदुर्ग, 4)हिंगोली. इ गट :- 1)मुंबई उपनगर, 2)ठाणे, 3)लातूर, 4)सातारा.
फ गट :- 1)औरंगाबाद, 2)रायगड, 3)परभणी, 4)धुळे, 5)नंदुरबार.