। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारीफ या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हयात शुक्रवारी (दि.16) सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन भवन येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि सदस्या या स्वतः तक्रारीची सुनावणी घेणार आहेत. या कार्यक्रमात आहारतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, अंगणवाडी सेविका, महिला, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
दुपारी 3 वाजता महिला आयोग अध्यक्षा रायगड जिल्हयाची आढावा बैठक घेणार आहेत. हे सर्व कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन, रायगड येथे होणार आहेत. अधिक माहितीसाठी श्रीमती सुनिता गणगे – 9702542071, शरद कोळेकर 7038630058 यांच्याशी संपर्क साधावा.






