। खोपोली । वार्ताहर ।
शिक्षकी पेशा हा जबाबदारीचा पेशा आहे. मात्र याच शिक्षकांकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याची खंत जेष्ठ कीर्तनकार व पत्रकार श्रीराम पुरोहित यांनी खोपोली येथे व्यक्त केली.
भांनवज येथील इच्छापूर्ती साईबाबा मंदिर ट्रस्ट आयोजित शिक्षक दिनाच्या पाश्वर्र्भूमीवर ब्राह्मण सभा सभागृहात निवृत्त शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, वकील, पत्रकार ,निवृत्त पोलीस , कीर्तनकार, प्रवचनकार, अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पूरोहित बोलत होते.
यावेळी पांडुरंग निकम, नरेंद्र हार्डीकररवींद्र दर्णे, दिवाकर पिल्ले उपस्थित होते. किशोर शेळके यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नरेंद्र हर्डीकर, दिवाकरन पिल्ले यांनी विचार मांडले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अशोक दरेकर यांनी केले.