| रोहा । प्रतिनिधी ।
संत शिरोमणी रोहिदास विकास मंडळा तर्फे शनिवार(10) ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, सिकेटी शाळे जवळ,नविन पनवेल येथे वधुवर सुचक व परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. चर्मकार समाजातील विवाह इच्छुक मुलामुलींना आपल्या पालकांसह उपस्थित राहुन या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कष्णा गायकवाड यांनी केले आहे. चर्मकार समाजातील मुला- मुलींना योग्य जीवनसाथी निवडणे सुलभ व्हावे यासाठी नवीन पनवेल येथील या मंडळातर्फे सुमारे 19 वर्षे अखंडितपणे वधुवर सुचक व परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यात सहभाग घेणार्या इच्छुक मुला मुलींनी स्वतःचे दोन रंगीत फोटो सोबत आणावे. नाव नोंदणी दुपारी 12 ते 2, ओळख, परिचय सत्र 2 ते 4 असे नियोजन करण्यात आले असून अधिक माहीतीसाठी मंडळाचे अध्यक्ष कष्णा गायकवाड 981992759, सचिव सुरेश पुगांवकर 7208864845, सत्यवान बेलापुरकर 9820398039 यांच्याकडे संपर्क साधावे असे अवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.