राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघातर्फे राज्यस्तरीय अधिवेशन

| खरोशी | प्रतिनिधी|

राज्यातील ओबीसी शिक्षकांच्या हक्क, सन्मान आणि संघटनात्मक अस्तित्वासाठी झटणाऱ्या, कोकण विभागाचे माजी शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय पहिल्या अधिवेशन व भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी संघटनेच्या पदाधिकारी यांनी मंत्रालयात भेट दिली.

ओबीसी शिक्षकांच्या प्रश्नांवर, त्यांच्या न्याय्य हक्कांवर, शैक्षणिक क्षेत्रातील उपेक्षेवर आणि राज्यात प्रथमच उभ्या राहत असलेल्या ओबीसी शिक्षकांच्या सशक्त संघटनात्मक चळवळीवर सविस्तर चर्चा केली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, ओबीसीचा बुलंद आवाज पडळकर यांना सदर निमंत्रण देण्यात आले. सर्व मंत्री महोदयांनी संघटनेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून सांगितले की, राज्यात ओबीसी शिक्षकांसाठी काम करणारी पहिली शिक्षक संघटना उभी केली, हे अभिमानास्पद काम आहे. ओबीसी शिक्षक बांधवांच्या लढ्यात आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत, असे आवर्जून सांगितले.

Exit mobile version