मुरुडच्या शिरपेचात मानाचा तुरा
| कोर्लई | वार्ताहर |
खारघर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने रायगड जिल्हा सदस्य आणि ऐन.पी.ओ. जे.के.के. इंडिया फेडरेशनच्या मान्यतेने शिहन-अनिल महादे, सेंसाय -ओमकार बोरचडे यांनी आयोजित केलेली खेल महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच पार पडली.
या स्पर्धेसाठी रायगड, मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतून 150 हून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. यामध्ये रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातून विद्यार्थ्यांनी 3 सुवर्ण पदके, 1 रौप्य पदक व 5 कांस्य पदके अशी एकूण 10 पदके पटकावत दमदार कामगिरी केली. त्याचप्रमाणे आपल्या नावे संघ चषक रायगड संघाने आपल्या नावे केली. या स्पर्धमध्ये स्वरा निशांत विरकुड – 2 सुवर्ण पदक, सिया शैलेंद्र सिंह- सुवर्ण व कांस्य पदक, स्वयम् सचिन अपराध- रौप्य व कांस्य पदक, पारस विद्याधर घुरुप- 2 कांस्य पदक, आर्णा अमित पाटील- कांस्य पदक मिळवून उत्तम कामगिरी केली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक शिहान- डॉ. आदित्य अनिल, सेंसाय- सनी रा. खेडेकर, शिवम धि. सिंह, शिवम अ. चव्हाण इत्यादी शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रगती घुरुप, निशांत विरकुड, अमृता पाटील, जैनेंद्र सिंह, पालक वर्ग तसेच शीतो रियु कमिटी महाराष्ट्रने त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.