राज्यस्तरीय एकपात्री, द्विपात्री स्पर्धा !

| अलिबाग | प्रतिनिधी |

सलग गेली पाच वर्ष अलिबाग मधे संपन्न होणारी अभिनयाची ही एकमेव राज्यस्तरीय स्पर्धा सोमवारी (दि.20) भाग्यलक्ष्मी सभागृह रंगमंच, अलिबाग येथे आयोजित करण्यात आली आहे. फ्रायडे फिल्म्स अलिबाग आयोजित, कै. लेखक, दिग्दर्शक विजय बारसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भरवण्यात येणार्‍या स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे.

महाराष्ट्रातल्या 11 पेक्षा जास्त जिल्ह्यातून, आत्तापर्यंत जवळजवळ 300 हून अधिक स्पर्धेकांचा सहभाग या स्पर्धेला लाभला आहे. स्पर्धेसाठी, वय वर्ष 14 ते 45 अशी वयोमर्यादा असेल. सदर स्पर्धेच्या सादरीकरणाची भाषा मराठी असून, एकपात्री साठी 5 ते 7 मिनिटं आणि द्विपात्री साठी 8 ते 10 मिनिटं अशी वेळ मर्यादा असेल. स्पर्धेतील विजेत्यांसाठी पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोख रक्कम अशी असेल. अलिबाग तथा रायगड मधील कलाकारांसाठी सुवर्णसंधी असलेल्या या स्पर्धेत जास्तीत जास्त अभिनेता/अभिनेत्रींनी आपला सहभाग नोंदवावा. माहितीसाठी – विवेक 9762260971, आश्रिता 7038557742 या क्रमांकावर संपर्क साधा.

Exit mobile version