राज्यस्तरीय कवी संमेलन

राज्यस्तरीय कवी संमेलन
। अलिबाग । वार्ताहर ।
द्रोणागिरी-उरण येथे द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे द्रोणागिरी फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत बुधवार ( दि.21 ) राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी आ. मनोहर भोईर होते तर अध्यक्षस्थानी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, निवृत्त प्रा. श्रीकांत पाटील, यशवंत ठाकूर, अरुण म्हात्रे, प्रियांका,नुतन, सुचित्रा कुंचमवार, संजय होळकर, हेमाली म्हात्रे-पाटील, भ.पो.म्हात्रे, मिनल माळी, शिवेंद्र म्हात्रे यांचा समावेश होता. प्रास्ताविक कवी अरुण म्हात्रे यांनी स्वरचित काव्यगायनाने केले.

यावेळी बीड, पुणे, मुंबई, पेण, पनवेल, कर्जत, अलिबाग, उरण येथून सत्तर कवी उपस्थित होते. या काव्यमैफलीत भूषण तांबे, शैल्य सुतार, कल्पना देशमुख सागरराजे निंबाळकर, विवेक आतकरी, आनंद घायवट, हरिश्‍चंद्र माळी, प्रदीप बडदे, मनोज उपाध्ये, संग्राम तोगरे, सचिन पाटील, सोमनाथ घरत, वासंती बोराडे, अरुण पाटील, श्रीकांत पाटील, श्री.वाघ, शिवेंद्र म्हात्रे, महेंद्र सूर्यवंशी यांचा समावेश होता. अरुण म्हात्रे यांनी सर्वांची गोड शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.

Exit mobile version