। उरण । वार्ताहर ।
जिल्हा स्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत गोशीन रियू कराटे च्या विद्यार्थ्यांनी विविध गटात भाग घेतला होता. त्यामध्ये अनेकांनी घवघवीत यश प्राप्त केले. अनिश पाटील, अमिता घरत, अमिषा घरत, रोहित घरत, समीक्षा पाटील नेहा पाटील, सुजित पाटील, अर्णव पाटील, शुभम ठाकूर, यांनी गोल्डमेडल पटकाविले. त्यांची निवड अहमदनगर येथे 23 ते 24 ऑक्टोबरला होणार्या राज्य स्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर तुमन्ना गावंड, श्रुती म्हात्रे, श्लोक ठाकूर सिल्व्हर मेडल तर अंश म्हात्रे व अमर घरत यांनी ब्रॉन्झ मेडल पटकाविले. तसेच तिथे जिल्हास्तरीय पंच परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये अमिता घरत, अमिषा घरत, अनिश पाटील मानसी ठाकूर, रोहित घरत, शुभम ठाकूर गोपाळ म्हात्रे, संतोष मोकल, शुभम म्हात्रे, कमलाकर म्हात्रे, कंकेश गावंड, प्रितम मोकळ, पंच परीक्षेत उत्तीर्ण झाले.
गोशीन रियूच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड
