किशोर पाटील यांना राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार

| चिरनेर । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील बोकडविरा येथील ज्येष्ठ कबड्डीपटू किशोर गजानन पाटील यांना रविवारी राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे आगरी साहित्य संमेलन भरले आहे. या संमेलनात राज्याचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. हा आगरी विकास मंडळाकडून देण्यात येणार्‍या राज्यस्तरीय क्रीडा गुणगौरव पुरस्कार आहे. मंडळाचे अध्यक्ष मोहन भोईर, पुंडलिक म्हात्रे,ऍड. पी. सी. पाटील, दमयंती भोईर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. पाटील हे जिल्ह्यातील प्रसिद्ध गणेश क्लब या संघाचा खेळाडू आहे.

Exit mobile version