पनवेल मधील उद्यानांची दुरावस्था

प्रीतम म्हात्रे कडून नाराजी व्यक्त

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल महानगरपालिकेने सिडकोच्या विभागातील उद्यानांचे हस्तांतरित करून घेतले आहेत. उन्हाळ्यामध्ये तिथे बर्‍याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने अनेक उद्यानांची वाताहात होती. आता पावसाळा सुरू झाला आहे सदर परिस्थितीत आयुक्तांनी पाहणी करून नव्याने वृक्षारोपण आणि इतर व्यवस्था पूर्ववत होईल याची दक्षता घ्यावी असे प्रितम म्हात्रे यांनी सुचवले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नवीन पनवेल सेक्टर 3 येथील गार्डन मध्ये रात्री दारु पिण्याचे प्रकार अंधाराचा फायदा घेऊन वाढत आहेत. त्यानंतर त्या बाटल्या तशाच फेकुन द्यायच्या. परिसरातील फूटपाथवर मातीचा ढिग तसेच रेबिट ठेवले आहे. त्यामुळे चालायचा प्रश्‍न निर्माण होत आहे. उद्यानांमध्ये रात्रीच्या वेळी दिवे सुरू नसतात. अंधाराचा फायदा घेऊन भविष्यात काही दुर्घटना घडू नये यासाठी सुरक्षारक्षक 24 तास नेमण्यात यावा. त्वरित लाईट व्यवस्था सुरू करण्यात यावी. तेथील सुविधांच्या बाबतीत अशा प्रकारची सध्य परिस्थिती त्यांनी आयुक्तांसमोर पत्राद्वारे मांडली. या सर्व गोष्टी गांभीर्याने पाहून महानगरपालिका क्षेत्रातील सर्व उद्यानांची पाहणी करून नागरिकांना मोकळा श्‍वास घेण्यासाठी उद्याने सुस्थितीत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या उद्यानांच्या बाबतीत अशा प्रकारची परिस्थिती बर्‍याचशा महानगरपालिका क्षेत्रातील उद्यानांमध्ये सध्या आहे. आयुक्तांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून त्वरित उपाययोजना करावी अशाप्रकारे मागणी मी केली आहे आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा यापुढे घेईन.

प्रीतम म्हात्रे
मा.विरोधी पक्षनेता,
पनवेल महानगरपालिका
Exit mobile version