सोलापुरामध्ये राज्य पक्षिमित्र संमेलन

। सोलापुर। वृत्तसंस्था ।
जिल्ह्यात आगामी वर्षातील महिन्यात 34 वे राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात वनमहर्षी मारूती चित्तमपल्ली व बी. एस कुलकर्णी या दोन्ही ज्येष्ठ पक्षिमित्रांच्या सन्मानार्थ काही विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. डॉ. मेतन फाउंडेशनने आयोजिलेल्या संमेलनासाठी सामाजिक वनीकरण व महाराष्ट्र वन विभागाच्या सोलापूर कार्यालयांचे सहकार्य लाभणार आहे.
ङ्गमाळरान-शिकार पक्षी आणि संवर्धनफ या संकल्पनेतून भरणार्‍या या संमेलनाची माहिती डॉ. मेतन फाउंडेशनचे अध्यक्षांनी दिली. सोलापुरात सोलापूरचे ज्येष्ठ पक्षिमित्र प्रा. निनाद शहा यांची या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी यापूर्वीच निवड झाली आहे.

Exit mobile version