अलिबाग ज्येष्ठ नागरिक संस्थेचा उपक्रम
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबाग व सखी सेवा संस्था, पुणे व यांच्या संयुक्त विद्यमाने भाऊसाहेब लेले चौक (अॅड. शिरीष लेले यांचे प्रांगणात) येथे गुरुवारी(दि.7) दुपारी 4.30 ते संध्याकाळी 6.30 या दरम्यान जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने भूली यादें या कार्यक्रमांतर्गत सुचेता बापट व सहकारी, पुणे यांचे पथनाट्य व शंका समाधान केले जाणार आहे. याच कार्यक्रमात ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉ. अनिल डोंगरे अलिबाग यांचेही मार्गदर्शन होणार आहे.
विस्मरण (अल्झायमर) हा एक छुपा आजार आहे. या विस्मरणाने जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या वर्तन समस्या वाढतात, त्याचा त्या व्यक्तीला, कुटूंबातील सदस्यांना, सहकार्यांना त्रास होऊ लागतो तेव्हा विस्मरण हा देखील एक गंभीर आजार आहे हे लक्षात येते. अलिकडे ही समस्या केवळ ज्येष्ठ नागरिकांपुरती राहिलेली नसून ती 40 ते 60 या वयोगटापर्यंत मागे आली आहे. त्याची कारणे तसेच हा आजार झालेल्या पेशंटना हाताळणे, या आजाराची लक्षणे तसेच त्यांच्या समस्या जाणून घेणे यासाठी भूली यादें या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबागचे अध्यक्ष ल.नी.नातू यांनी केले आहे.