। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बॅरिस्टर अंतुले भवन अलिबाग येथे नव्याने राज्यकामगार विमा योजनेचे केंद्र वैद्यकीय प्रशासन अधिकारी मुंबई विभागात 1 डॉक्टरचे माध्यमातून सुरू केला आहे. राज्याचे आरोग्य विभाग प्रधान सचिव, डॉ. एम. निलिमा केरकट्टा यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच रुग्णाचे आरोग्य तपासणीसाठी आयोजित केलेल्या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित विमाधारकांना योजनेविषयी सविस्तर माहिती देऊन विमाधारकांच्या हिताच्या जोपासणेविषयी मार्गदर्शन केले. नवीन सेवा दवाखाना असल्याने व नवीन कंत्राटी कर्मचार्यांचे माध्यमातून सेवा सुरू झाल्याने त्यांनाही मार्गदर्शन केले. सदर सेवा दवाखान्यासाठी सर्व सुविधायुक्त व कमी भाड्यामध्ये जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद देऊन सबंधितांचे आभार मानले.
श्रमश्री योजने अंतर्गत रुग्णांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याचा लाभ विमा कामगारांनी घेतला. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. कश्यप द्विवेदी, यांनी केले. कार्यक्रमाचे आभार ज्ञानदेव भगत यांनी व सूत्रसंचालन विशाल माने यांनी केले. कार्यक्रमासाठी काँग्रेस भवन ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. जे. टी. पाटील, योगेश मगर, निरंजन सुर्यवंशी, भगवान पेडणेकर, मिश्रक जयसिंग सांगळे व अनिल म्हस्के व प्रगती म्हात्रे स्टाफ नर्स तसेच शिपाई बोंडारे हेही हजर होते.






