म्हसळ्यात महाविकास आघाडीतर्फे निवेदन

। म्हसळा । वार्ताहर ।
उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी येथे अन्नदाता शेतकरीराजा न्याय हक्कासाठी केंद्र सरकारच्या दारी शांततेत व अहिंसा मार्गाने आंदोलन करीत असताना शेतकर्‍यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकार मधील घटक हिंसेचा मार्ग अवलंबून शेतकर्‍यांची हत्या करीत आहे. सदर घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार मधील महाविकास आघाडीतील पक्षांनी स्वतंत्र पणे सहभागी होऊन म्हसळा बाजारपेठ बंद ठेवून लखीमपुर घटनेचा जाहीर निषेध केला आहे.
म्हसळा तालुक्यातील मविआ सरकार मधील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना, काँग्रेस आणि शेकापच्या प्रमुखांनी लखीमपुर येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध नोंदविण्यासाठी निदर्शने करून म्हसळा तहसीलदार समीर घारे यांच्याकडे केंद्र सरकारला जाग यावी यासाठी वेगवेगळे निषेधपत्र देण्यात आले आहेत.

Exit mobile version