शिक्षकासाठी चंदरगाव ग्रामस्थांचे गटशिक्षणाधिकारीनां निवेदन

| पाली । वार्ताहर ।

सुधागड तालुक्यातील डोंगराल भागात आसलेल्या चंदरगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कमी शिक्षक कार्यरत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आपल्या पाल्यांना शिक्षक मिळावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी थेट पंचायत समिती कार्यालय गाठत गटविकास अधिकार्‍यांना निवेदन दिले.

तालुक्यातील चांदरगाव या गावात जिल्हा परिषदेची शाळा असून या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जाते, परंतु या सातही वर्गाला शिकवण्यासाठी फक्त तीन शिक्षक आहेत परिणामी महत्त्वाच्या वर्गावर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच नसल्याने त्यांचे शिक्षण होणार कसे, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे. विशेष म्हणजे या शाळेत शेतकर्‍यांचे मुले आहेत. त्यांची आर्थिक परिस्थितीने बिकट असल्याने पालक आपल्या मुलांना याच शाळेत शिकवतात, परंतु त्यांना पाहिजे तसे शिक्षक न मिळण्यास ते पुढील शिक्षण घेणार तरी कसे, असा प्रश्‍न पालकांना पडला आहे.

कोरोनाच्या काळात बरेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. मोबाईल नसल्यामुळे ते ऑनलाईन अभ्यास सुद्धा करू शकले नाहीत. या वर्षी शाळा सुरू झाली असूनही पुर्ण विषयांसाठी शिक्षक नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आपले शैक्षणिक नुकसान होवू नये, तसेच शाळेत शिकवायला आणखी शिक्षक मिळावे यासाठी गावातील नागरिकांनी पाली येथील पंचायत समिती कार्यालय गाठून गटविकास अधिकारी यांना शिक्षक मिळण्याबाबत निवेदन दिले.

सुधागड तालुक्यातील चंदरगाव येथील ग्रामस्थांनी त्यांच्या गावातील शाळेला वाढीव शिक्षक मिळावे असे लेखी निवेदन नुकतेच दिले होते. त्यावर तात्काळ दखल घेऊन येथील शाळेवर एक शिक्षक वाढविले असून एकूण चार शिक्षक येथे कार्यरत आहेत.

साधुराम बांगारे,
गटशिक्षणाधिकारी सुधागड
Exit mobile version