| आगरदांडा | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग संघर्ष समितीच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्या मान्य करण्याकरिता मुरुड नगरपरिषदेच्या कर्मचार्यांनी मुख्याधिकार्यांना निवेदन दिले आहे.
यावेळी रायगड जिल्ह्याचे व मुरुड नगरपरिषदेचे कामागार संघटनेचे अध्यक्ष राकेश पाटील, उपाध्यक्ष प्रकाश आरेकर, खजिनदार संजय वेटकोळी, परेश कुंभार, नरेंद्र नांदगांवकर, सतेज निमकर, सुदेश माळी, स्वप्नजा विरुकुड, उमेश शिंदे, जयेश चोडणेकर, संजय बामगुडे, प्रणाली करडे, मितेश माळी, दिपक शिंदे, रिया मांढरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.