| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील निल समृद्धी सोसायटी नं.1 येथे गेले दोन दिवस मांजीचे पिल्लू अडकून पडले होते. त्याला नेचर फ्रेंडस् सोसायटीच्या सदस्यांनी व पनवेल अग्नीशमन दलाने रेस्न्युुद्वारे जीवनदान दिले आहे. गेले दोन दिवस मांजराचे एक लहान पिल्लू दुसर्या मजल्यावरील खिडकीच्या सज्जावर अडकून पडले होते. आईविना सारखे ओरडत होते. तात्काळ सर्प मित्र व नेचर फ्रेंडस् सोसायटीचे पनवेल सदस्य शार्दुल वारंगे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी लगेचच पनवेल अग्नीशमन दलाला कळवून पूर्ण टिम बोलावली. भर पावसात अथक त्या पिल्लाची सुटका केली.