| पनवेल | वार्ताहर |
तळोजा पोलिसांनी दोन लाखांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी रामसिंग रेहवतसिंग टेवडा (रा. सेक्टर दोन तळोजा) याच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 3 ते 4 जुलै दरम्यान तळोजा सेक्टर 2 येथील सोसायटीच्या शॉपमध्ये गुटख्याची साठवणूक केल्याची माहिती तळोजा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी शॉपमध्ये गुटख्याच्या पिशव्या सापडून आल्या. दोन लाख 1 हजार 530 रुपयाचा गुटखा पोलिसांनी जप्त केला.