| पनवेल | प्रतिनिधी |
कामोठे शहरातील गेल्या काही महिन्यापासून मध्यरात्री आणि दिवसा 2 ते 3 वेळा विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने या अनागोंदी कारभाराच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कामोठे महावितरणविरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे.
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या सुत्रास अनुसरुन शिवसेना शहर कामोठे शिवसेना शहरप्रमुख रामदास गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर प्रमुख सचिन मनोहर त्रिमुखे यांनी कार्यकारी अभियंता सिडको प्रकाश पारधी यांची भेट घेऊन या अनागोंदी कारभाराचा जाब विचारला. यावेळी शहर संघटक संतोष गोळे , उपशहर गणेश गांडगे , महिला आघाडीच्या संगीता राऊत, मीना सदरे , दीक्षा लवंगरे, स्मिता लँगरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.