ब्राह्मण संस्थेकडून निषेधाचे निवेदन

। पाली । वार्ताहर ।

संपूर्ण ब्राह्मण समाजाला संपवून टाकण्याची भाषा करणार्‍या वक्तव्याचा निषेध करणारे निवेदन शुक्रवारी (दि.1) सुधागड तालुका ब्राह्मण संस्थेच्यावतीने पाली तहसीलदार उत्तम कुंभार यांना देण्यात आले. युट्युब वरील व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपविण्याची भाषा करणारे वक्तव्य केले आहे. ब्राह्मण समाज कायमच जातीय सलोखा राखण्याचे काम करीत आलेला आहे आणि यापुढेही करीत राहणार. मात्र, ब्राह्मण समाजाविषयी जातीवाचक अभद्र टिप्पणी करणार्‍या इसमाला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन पाली पोलीस ठाण्यात देखील देण्यात आले.

Exit mobile version