| आगरदांडा | प्रतिनिधी |
प्रवासीवर्गाची होणारी अडचण लक्षात घेऊन सकाळी 7.15 वाजता अलिबाग-मुरूड एसटी सुरू करावी, त्याकरिता मुरूड एसटी आगारव्यवस्थापकांकडे मुरुड जंजिरा रहिवासी संघाकडून निवेदन सादर करण्यात आले. यावेळी दिलीप गुंजाळ, अशोक कमाने, दिगंबर केळुस्कर, विकास मिरजणकर, अशोक दिवेकर, शैलेश वारेकर, उत्तम पाटील आदी सदस्य उपस्थित होते.
अलिबागवरुन सकाळी 8.15 वाजता मरूडला एसटी सुटत असल्याने निमशासकीय कर्मचारी व विद्यार्थी किंवा सामान्य नागरिक यांना सकाळी नऊ वाजण्याच्या वेळेत मुरूडला पोहचता येत नाही. त्यामुळे सर्व प्रवासीवर्गाचे हाल होत आहेत. त्याचबरोबर वृत्तपत्र ही वेळेत मिळत नसल्याने वृत्तपत्र वाचक यांनी ही नाराजी दर्शवली आहे. तरी सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांच्या समस्याचा विचार करुन आगार व्यवस्थापकांनी अलिबागवरुन मुरूड एसटी सकाळी 7.15 वाजता सोडावी, अशी मागणी मुरूड जंजिरा रहिवासी संघाकडून करण्यात आली आहे.