| अलिबाग | प्रतिनिधी |
भारताचे माजी लष्कर प्रमुख तथा अलिबागचे सुपुत्र जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यतिथी शासकीय इतमामाने साजरी होण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर गेली 3 वर्षे प्रयत्न करत आहेत. याबाबत मुख्यमंत्री महोदयांची अनुमती मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार प्रकरण मंत्रालयात प्रलंबित आहे. याप्रकरणी अलिबाग नगरपरिषदेची शिफारस मिळण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी नगराध्यक्षा अक्षया नाईक यांना निवेदन दिले. यावेळी समिती सदस्य ॲड. रघूजी आँग्रे, आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, माजी नगरसेवक अजय झुँझारराव व मुख्याधिकारी साळुंखे उपस्थित होते.







