| माथेरान | प्रतिनिधी |
दरवर्षी मार्च ते एप्रिल महिन्यात माथेरानमधील प्रवासी वाहतूक करणार्या घोड्यांची पासिंग पोलीस ठाणे माथेरान याठिकाणी केली जाते. परंतु यावर्षी मे महिना उलटून जात असताना सुध्दा अद्यापही याबाबत संबंधीत खात्याने काही उपाययोजना न केल्यामुळे येथील अश्वपाल तथा माथेरानचे स्वच्छता दूत राकेश कोकळे यांनी कर्जत येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत यांना लेखी निवेदन सादर केले आहे. लवकरच 460 प्रवासी वाहतूक करणार्या घोड्यांची पासिंग घेतली जाण्याची शक्यता त्यांच्या निवेदनावरून निर्माण झाली आहे.
पोलीस अधिकार्यांना निवेदन
