| पाली/गोमाशी । वार्ताहर ।
वीज महावितरणाकडून वीज कंपन्यांकडून दरवाढीचा प्रस्ताव ठेवला तसेच गॅसचे दर देखील भरमसाठ वाढले आहेत. या विरोधात गुरुवारी (दि.13) जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टी सुधागडतर्फे महावितरण कार्यालय पाली व तहसील कार्यालय पाली येथे निवेदन दिले. या आंदोलनात आपचे जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे, अशोक उपाध्याय, अशोक रायकर, इरफान शेख, विलास पांचाल, अल्ताफ पानसरे, फैसल महाडकर, दीप्ती दळवी, दत्तात्रेय दळवी, यशोदा जगताप, राकेश कांबळे, शेखर पवार, समीर फणसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.