महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी तळा पोलीस ठाण्याला निवेदन

| तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस महिलांवरील वाढत असलेले अत्याचार रोखण्यासाठी तालुक्यातील पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून तळा पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले. तालुक्यातील चोरवली, पन्हेली व कासेखोल या ठिकाणी अज्ञात व्यक्तीकडून महिलांची छेडछाड व लूटमार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तालुक्यात तिसर्‍यांदा ही घटना घडल्याने येथील नागरिक व महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महिलांमध्ये पसरलेल्या भीतीच्या वातावरणामुळे या परिसरतील महिला घराबाहेर देखील पडत नाहीत. त्यामुळे या अज्ञात आरोपीला लवकरात लवकर अटक करावी या मागणीचे निवेदन संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थांतर्फे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना देण्यात आले. पीएसआय खराडे, पोलीस हवालदार पवार, पोलीस हवालदार शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागचे पीएसआय साठे, पोलीस हवालदार चव्हाण, तपास करीत असल्याचे सांगितले. यावेळी ताम्हाणे, माजगाव, गणेशनगर,कासेखोल चोरवली, पन्हेळी, बोरीचा माळ, तळेगाव व वांजळोशी गावातील ग्रामस्थ कमिटी उपस्थित होते.

Exit mobile version