जोफ्रा आर्चर ईसीबीचे आदेश
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आयपीएल 2024चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. स्पर्धेतील 10 संघ यासाठी सज्ज झाले असून, यासाठी 1 हजार 166 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. दरम्यान, इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आयपीएलच्या आगमी हंगामापासून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईसीबीने आर्चरच्या वर्ल्डलोक मॅनेजमेंटचा विचार करून त्याला 2024च्या टी-20 वर्ल्डकपची तयारी करण्याच्या दृष्टीने हे आदेश दिले आहे.
आर्चरला 2022च्या लिलावात मुंबई इंडियन्सने 8 कोटी रुपयांना संघात घेतले होते. मात्र, दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही आले नाही. 2023च्या हंगामात त्याला पुन्हा दुखापत झाली होती. तर गेल्याच आठवड्यात आयपीएल 2024च्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने आर्चरला रिलीझ केले होते. मुंबईच्या आधी आर्जर राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता. दरम्यान, ज्या खेळाडूंनी आयपीएलच्या लिलावासाठी नोंदणी केली होती त्यामध्ये आर्चरचे नाव नव्हते. दुखापतीमुळे आर्चरला गेल्या काही काळापासून मैदानातून दूर राहावे लागले. दुखापतीमुळेच तो वनडे वर्ल्डकप 2024 देखील खेळू शकला नाही. ईसीबीने आर्चरला दोन वर्षाच्या करारात कायम ठेवले आहे. पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी आर्चरने तयारी करावी, असे ईसीबीचे मत आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडसाठी आर्चर हा महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. त्यामुळेच बोर्डाने हा निर्णय घेतल्याचे समजते.







