| पनवेल | वार्ताहर |
पन्नास वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने खेचून चोरटे मोटर सायकलवरून पसार झाल्याची घटना कळंबोलीत घडली. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जयश्री ठोंबरे या कळंबोलीतील सिडको गार्डनसमोरून जात होत्या. यावेळी पाठीमागून आलेल्या दोन मोटर सायकल स्वारांनी जयश्री यांना धक्का देऊन त्यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरीने खेचून ते कार्मेल स्कूलच्या दिशेने पळून गेले. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.