शेअर बाजारात तेजी; 15 मिनिटांत 4 लाख कोटींची कमाई

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भाजपाच्या तीन राज्यांतील विजयानंतर सोमवारी शेअर बाजारातील व्यापाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार विक्रमी पातळीवर उघडला. बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी त्यांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले आहेत.

सेन्सेक्स 1,049.31 म्हणजेच 1.55 टक्क्यांच्या वाढीसह 68,530.50 अंकांवर आणि निफ्टी 316.70 अंकांच्या म्हणजेच 1.56 टक्क्यांच्या वाढीसह 20,584.60 अंकांवर उघडला. बाजाराला मजबूत देशांतर्गत आणि जागतिक संकेतांचा पाठिंबा मिळत आहे. निफ्टीमध्ये अदाणी एंटरप्रायझेस आणि अदाणी पोर्ट्सचे शेअर्स 4 ते 7 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

एवढेच नाही तर बीएसईने बाजार उघडताच 15 मिनिटांत 4 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. जर आपणाला शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात वाढ दर्शविलेल्या निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास तर निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक मध्ये बंपर वाढ नोंदवली जात आहे.

15 मिनिटांत 4 लाख कोटींची कमाई
सोमवारी शेअर बाजार उघडल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य 4 लाख कोटी रुपयांनी वाढून 341.76 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. म्हणजेच मार्केट ओपनिंगच्या 15 मिनिटांत बीएसईने 4 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. बाजारातील जाणकारांच्या मते 4 राज्यांच्या निवडणूक निकालांमुळे बाजारात सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे.

Exit mobile version