| मुंबई | प्रतिनिधी |
आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात खराब जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 25000 च्या खाली घसरला. आयटी आणि वाहन शेअर्समध्ये विक्री झाल्यामुळे बाजारात ही घसरण दिसून आली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सही मोठ्या प्रमाणात घसरण झाली. बाजार बंद झाल्यानंतर बीएसई सेन्सेक्स 886 अंकांनी घसरला आणि 81000 अंकांच्या खाली 80,982 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 311 अंकांच्या घसरणीसह 24,699.50 अंकांवर बंद झाला आहे.