बंद घराची घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहरातील एका बंद घरात अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत लाखो रुपयांचा ऐवज व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी येथे राहणारे संजय रीसबुड यांच्या बंद घराच्या दरवाजाला असलेले कुलूप अज्ञात चोरट्यांनी कशाने तरी तोडून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, हिर्‍यांचे अलंकार व रोख रक्कम असा मिळून जवळपास 4 लाख 24 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version