। नगर । वार्ताहर ।
राज्यात एसटी संप अजूनही कायम आहे. 27 ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपावर राज्य सरकारने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतू एसटीचं शासनात विलीनीकरण करण्याची मागणी अजूनही मान्य झाली नाही. मात्र, परिवहन मंत्री अनिल परब यांनी जवळपास 41 टक्क्यांची पगारवाढ जाहीर केली आहे. तरीही अद्याप काही ठिकाणी संप सुरू आहे.
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून अनेक आगारांमधून एसटी पुन्हा धावू लागल्या आहेत. त्यामुळे काही जणांनी एसटीवर दगडफेक केली. नगरमध्ये या घटना पाहायला मिळाल्या. बस डेपोतील चालक यामध्ये जखमी झाला आहे. प्रवासी बसमध्ये असताना हा हल्ला झाला. एसटीच्या काचा फोडण्यात आल्या. रूजू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर दहशत पसरवण्याचा हा प्रकार आहे, दगडफेकीत नामदेव खंडागळे हे चालक जखमी झाले आहेत.