ऑनलाईन शिक्षण बंद करा-पाटील

| उरण | प्रतिनिधी|

मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासातील लक्ष विचलित होत असून, शाळा-कॉलेजातील शिक्षकांनी यापुढे मोबाईलवर शिक्षणाचा वापर करू नये. मोबाईल वापरामुळे शिक्षकांचा कामाचा ताण कमी होतो, परंतु शिक्षकांनी यापुढे पारंपरिक पद्धतीनेच विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे, अशी पालकांची विनंती आहे. या सर्व गोष्टीची शिक्षणाधिकारी, शालेय शिक्षणमंत्री यांनी वेळीच दखल घेऊन ऑनलाईन शिक्षण बंद करावे, अशी मागणी तुळसीदास पाटील यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने गेल्या दोन वर्षा पासून म्हणजेच कोरोना कालावधीत शाळा- कॉलेजातील विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण देणे बंद केले असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धत चालू केली गेली. परंतु, आता सर्व परिस्थिती सुरळीत पूर्वीप्रमाणे चालू झाली असतानाही काही शाळा-कॉलेजात ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाईलसक्ती केली जाते. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मोबाईलवाचून वंचित आहेत, त्यामुळे त्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही. तर, काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल आहेत, पण त्याचा वापर शिक्षणापेक्षा अन्य गोष्टींसाठी सर्रास होत असल्याने पालकवर्गात असंतोष पसरला आहे. तरी, ऑनलाईन शिक्षण वेळी थांबवून शिक्षकांनी शाळेत मुलांना शिक्षण देण्यावर भर द्यावा, अशी मागणीही श्री. पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version