सावरीची तोड थांबवा

| पेण | वार्ताहर |

होळीसाठी चार-आठ दिवस आधीपासून गावकरी जंगलात सावरीचे झाड शोधून गावात आणतात, मात्र झाड हे माणसाला ऑक्सिजन, हवा, सावली देत असल्याने होळीसाठी तोडू नये, असे आवाहन वृक्षप्रेमी प्रा. उदय मानकवळे यांनी केले आहे. कोकणासह रायगड जिल्ह्यात होळीसाठी सावरीची जिवंत झाडे तोडून जाळली जात असल्याने पर्यावरणाचा मोठ्‍या प्रमाणात ऱ्हास होतो. त्यामुळे या झाडांची कत्तल थांबवावी, असे आवाहन पेण एज्युकेशन सोसायटीचे प्राध्यापक तथा वृक्षप्रेमी उदय मानकवळे यांनी केली आहे.

Exit mobile version