खानाव केंद्र आयोजित स्टोरी टेलिंग स्पर्धा

| अलिबाग | वार्ताहर |

खानाव केंद्रात इंग्रजी विषयाची स्टोरी टेलिंग स्पर्धा संपन्न झाली. ही स्पर्धा रायगड जिल्हा परिषद शाळा बोरपाडा शाळेत आयोजित करण्यात आली होती. खानाव केंद्राचे केंद्रप्रमुख संजय पोइलकर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा पार पडली. इंग्रजी विषयात प्रत्येक विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, गोडी लागावी आणि त्या विषयाची भीती वाटू नये. त्या दृष्टीने ही स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता पहिली ते सातवी या गटात स्पर्धा झाली. प्रत्येक शाळेतील प्रत्येक इतत्तेचा एक विद्यार्थी सहभागी झाला होता. स्पर्धेत एकूण 87 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांनी खूप सुंदर सादरीकरण केले. प्रत्येक इयत्तांमधून एक ते तीन व उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले. स्पर्धेसाठी स्व. कमलाकर टोपले यांच्या स्मरणार्थ दिनेश टोपलेंकडून आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदिप मानकर, उपाध्यक्ष मयुरी, तसेच सर्व सदस्यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक जयदास पाटील, तसेच क्रांती महाले यांनी आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी साधन व्यक्ती मेघा मगर, ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version