| पुणे | वृत्तसंस्था |
पुण्यातील कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने जाणार्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर थांबलेल्या वाहनाला धडक दिल्याने विचित्र अपघात घडला आहे. या विचित्र अपघात घडत लहानमोठी सात ते आठ वाहने एकमेकांना धडकली. यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने आज सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास एक ट्रक भरधाव वेगाने जात होता. तेवढ्यात ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पुढे असलेल्या सात ते आठ वाहनांना ट्रकने धडक दिली. या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्या वाहनांमधील काही नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहने बाजूला केली. तसेच, जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.