माजगांव ग्रामपंचायतचा अजब कारभार; उपसरपंच मिनल जाधव यांची चौकशीची मागणी

खोपोली | संतोषी म्हात्रे |         

खालापूर तालुक्यातील  माजगांव ग्रामपंचायती च्या हद्दीत असणारी गुरचरण जमिन एक निवृत्त माझी सैनिकाला चक्क पाच एकर जमिनी साठी कायदेशीर बाब न तपसताच ना हरकत दाखला देऊन अजब कारभार केल्याचे समोर येताच खळबळ उडाली आ अजब कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून सदरच्या नाहरकत दाखल्याला येथील ग्रामस्थानी विरोध दर्शवत नुकताच पार पडलेल्या ग्रामसभेत नाहरकत दाखला न देण्याचा ठराव घेऊन यात गैरव्यवाहर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

मांजगाव ग्रुप ग्राम पंचयत हद्दीत शासनाची गुरचरण असलेली जागा कोणताही अधिकार नसताना येथील सरपंच आणी तात्कालीन  ग्रामसेवक तसेच निवडक सदस्य घेवून यांच्या सहमताने एका नौसेनेमधुन सेवा निवृत्त माजी  सैनिक यांना  चक्क पाच एकर जमिनीसाठी ना हारकत दाखला दिल्यामुळे या अजब कारभाराच्या व्यवहारामुळे  या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.ग्रामपंचायत हद्दीतील असलेली वारद गावानजिक गुरचरण सर्वे नं. 10/0 मधिल 2 हेक्टर जागा मिळविण्यासाठी ना हारकत दाखला दि. 7 /5 /2021 रोजी सुभाष रामचंद्र पाटील यांस गैरव्यवहारपोटी दिला असल्याचे माजगांव विद्यमान  सरपंच, व  तात्कालीन ग्रामसेवक यांची चौकशी होवून कारवाई व्हावी यासाठी उप सरपंच माजगांव मिनल जाधव यांनी विविध ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केले आहे .               

दि. 29 /4 /2021 रोजी माजी सैनिक सुभाष पाटील यांनी माजगांव हद्दीतील वारद येथिल 10 /0 एकूण क्षेत्र 8  – 23- 50 हेक्टर आर एवढे असून त्यापैकी 2  00 – 00 हेक्टर आर म्हणजे म्हणजे पाच एकर शासनाकडून देण्यासाठी ग्रामपंचायती ने ना हारकत मिळण्यासाठी अर्ज करण्यात आले होते.यासाठी 30 /3 /2021 रोजी ठराव झाले असे दाखवून यासाठी काहीही हारकत नाही.मात्र प्रत्यक्षात 7 /12 /2021 रोजी  म्हणजे जवळ – जवळ 37  दिवसांनी अर्ज टाईप  करण्यात आल्याचे समजते.      

ही व्यक्ती जळगांव जिल्ह्यातील असून सध्या पनवेल येथे राहत आहे.मात्र आपण मोहपाडा येथे 20  ते 25  वर्ष राहत असल्याचे दर्शविले आहे.मात्र ती व्यक्ती या ठिकाणी आता राहतच नाही असेयेथील ग्रामस्थानी सांगितले आहे . मात्र यासाठी किती जणांनी आपले खिसे ओले केले आसा प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे. ग्रूप  ग्राम पंचायत माजगांव  4 गावे आणी वाड्या वसून एकून सात गावाचा असतांना दर वर्षी वाढत जाणारी लोकसंख्या यामुळे राहत्या घरांचा प्रश्न भेडसावत असतांना सदर जागा उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी घरे बांधली जावू शकतात. मात्र त्यांचा योग्य उपयोग करणे गरजेचे आहे.त्याच समवेत  या ग्रामपंचायत ला घंटा गाडी असून घरघुती कचरा मार्गी लावण्यासाठी ही गुरचरण जागेचा ठिकाणी प्रश्न मार्गी लावू शकतो.मात्र याचा कोणताही विचार न करता ग्रामपंचयातीने सरपंचासह निवडक सदस्य व तात्कालीन ग्रामसेवक यांनी या जागेचा परस्पर नाहरकत दाखला दिल्याने नुकताच पार पडलेल्या ग्राम सभेत येथील ग्रामस्थानी आक्षेप घेत नाहरकत दाखल रद्द करावा व पुन्हा देऊ नये असा ठराव घेतला आहे 

मांजगाव ग्रुप ग्राम पंचायत हद्दीत असणारी गुरचन जागा ही फक्त पंचयत देखभाल करीत आहे याबाबत काय निर्णय  घ्यायचा तो अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असल्याने सदरच्या जागे बाबत ग्रामसभेत ग्रामस्थानी विरोध दर्शविला असल्याने त्याची जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येईल त्यावर काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे.

संदीप एल.  धारणे ग्रामसेवक मांजगाव

Exit mobile version